पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने स्पर्धा परीक्षार्थींसह पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे आंदोलन सुरू केले आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२३पासून राज्यसेवा परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात आतापर्यंत दोन वेळा काँग्रेसने आंदोलन केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षार्थींनी केलेल्या अराजकीय आंदोलनात गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२५पासून बदल करण्याची सकारात्मक भूमिका घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित बदल २०२५पासून लागू करण्याची आयोगाला विनंती केली.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

हेही वाचा >>> Chinchwad Election: भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत!, आज ‘या’ स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार…

त्यानंतर आयोगाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात स्पर्धा परीक्षार्थींनी २०२३पासूनच बदल लागू करण्याची मागणी केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर आश्वासन नको अंमलबजावणी हवी म्हणत काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर काय निर्णय होणार याबाबत संभ्रम असून निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.