पुणे : काँग्रेस भवनाचे छायाचित्र समाजामाध्यमातून प्रसारित करून काँग्रेस भवनाचा उल्लेख ‘राजवाडा’ असा करत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला डिवचल्याचे संतप्त पडसाद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटले. काँग्रेस-भाजपमधील समाजमाध्यमातील वाद थेट रस्त्यावर आला. आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले. मात्र आंदोलन करण्यात येणार नव्हते. काँग्रेस भवनाची माहिती पुस्तिका भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार होती, असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र यामुळे शहरातील राजकीय वातावरण काही काळ गंभीर झाले होते.

भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून काँग्रेस भवनाचा उल्लेख राजवाडा करत तसे छायाचित्र समाजमाध्यमातू प्रसिरात करण्यात आले. ऐतिहासिक वास्तूची बदनामी केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली. काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस भवनात जमा झाल्यानंतर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भवनाचा दरवाजा बंद करून पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाज्यावरून उड्या मारत कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाकडे मोर्चा वळविला.

controversy, nitin Gadkari photo, agitation of congress, nagpur
मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
wardha lok sabha seat, Dr. Sachin Pavde, maha vikas aghadi candidate amar kale, Dr. Sachin Pavde s Presence congress event, Sparks Speculation congress entry,
‘हे’ प्रसिद्ध डॉक्टर व समाजसेवी काँग्रेसमध्ये? नेमके काय झाले, वाचा…
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
Ashish Shelar
आशिष शेलार यांचा काँग्रेसला टोला; म्हणाले, “जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन म्हणजे लबाडाघरचे जेवण”

हेही वाचा >>> पुणे पाठोपाठ आता ‘मावळ’ही आमचे!, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…

युवक कांग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, शहराध्यक्ष राहूल शिरसाट, प्रथमेश आबनावे, हनुमंत पवार, संतोष पाटोळे, स्वप्नी नाईक, वहिद नीलगर, परवेज तांबोली, केतन जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन करण्यात येणार नसून केवळ माहिती पुस्तिका देण्यात येणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी त्याला अटकाव केला, असे अक्षय जैन यांनी सांगितले. भाजप कार्यकालयापुढेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे शहरातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद संपुष्टात आला.