पुणे : जनवाडी भागातील पाण्याच्या टाक्याच्या उद्घाटनाचे श्रेय भाजपने घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. पुणे पोलिसांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला.

जनवाडी येथील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन भाजपने शुक्रवारी केले. माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी टाकी उभी करण्यासाठी प्रयत्न केले होते. भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उद्घाटनाचा घाट घातला. त्यावेळी काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तेथे गेले होते. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी काठ्या उभारल्या, तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केली, असे धंगेकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी केली. काँग्रेसचे नेते मोहन जोशी, संजय बालगुडे, शिवसेनेचे गजानन थरकुडे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : काँग्रेसला शह देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी ज्या पद्धतीने कार्यकर्ते आणि पत्रकारांना दिली. ती योग्य नाही. पोलिसांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा धंगेकर यांनी दिला.