औरंगाबाद येथील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सर्व प्रकारच्या समाजातील लोकांना एकत्र करु शांतता राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. औरंगाबाद येथील हिंसाचाराच्या घटनेवर पुण्यातील एका बैठकींनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान, पत्रकारांनी त्यांना औरंगाबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न विचारले त्याला उत्तरे देताना फडणवीस म्हणाले, औरंगाबादमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक सकाळपासून शहरात तैनात करण्यात आली आहे. आता त्या ठिकाणी शांतता असून जे कोणी दंगल घडविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. औरंगाबादच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controlling the situation in aurangabad do not believe in rumors says cm
First published on: 12-05-2018 at 18:32 IST