‘आधीच स्मार्ट’

‘स्मार्ट सिटी’साठी पुण्यातील बाणेर रस्त्याची निवड केली. आधीच स्मार्ट असलेल्या रस्त्याची निवड कशी काय केली जाते. पर्वती, गंज पेठ, नाना पेठ, येरवडा अशी ठिकाणे निवडण्याची आवश्यकता होती. ‘स्मार्ट सिटी’चा कार्यक्रम बालेवाडीत आहे. ते कोणी स्मार्ट केले आहे, याची माहिती सर्वानाच आहे, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली. गुणवत्ता असूनही पिंपरी-चिंचवडला डावलण्यात आले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व येथील जनतेने शहराला यापूर्वीच स्मार्ट करून ठेवले आहे, असेही ते म्हणाले.प्रतिनिधी, पुणे</p>

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला (सीओईपी) स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळावा याबाबत शासनाची भूमिका सकारात्मक असून याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. सीओईपीमध्ये सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहाच्या निर्मिती प्रकल्पासाठी  ५० लाख रुपये अनुदान देण्याचेही तावडे यांनी शुक्रवारी जाहीर केले.

‘स्वयम’ या उपग्रहाची निर्मिती करणाऱ्या ‘सीओईपी’तील विद्यार्थी व प्राध्यापकांचा तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार विजय काळे, सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. राजेंद्र हिरेमठ, विकास पाटील, तंत्रशिक्षणचे विभागीय सहसंचालक डी. आर. नंदनवार आदी उपस्थित होते. या वेळी तावडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचे हे यश महाराष्ट्रासह देशाला भूषण वाटणारे आहे. सलग आठ वर्ष सांघिकपणे काम करून एखादा प्रकल्प पूर्ण करणे खूप कठीण असते. ते या विद्यार्थ्यांनी करून दाखविले आहे. सीओईपीला स्वायत्तता मिळाल्यानंतर वेगाने विकास होत आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतर विकास होत असेल तर त्यांना अडवणे चुकीचे आहे. त्यामुळे सीओईपीला विद्यापीठाचा दर्जा देण्याचा सकारात्मक विचार केला जाईल. लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.’

‘स्वयम’नंतर विद्यार्थ्यांनी दुसरा उपग्रह बनवण्याच्या प्रकल्पाची सुरूवात केली आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण विभागाकडून ५० लाख रुपये देण्याची घोषणाही तावडे यांनी या वेळी केली. पुढील ३ वर्षांत राज्यातील संशोधनावरील खर्च १० ते १५ टक्क्यांपर्यंत नेणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.