विद्याधर कुलकर्णी

पुणे : दोन वर्षांच्या खंडानंतर निघणाऱ्या पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मानाचे अश्व सज्ज झाले आहेत. कर्नाटकातील बेळगावनजीक असलेल्या अंकली येथून १० जून रोजी हिरा-मोती हे मानाचे अश्वद्वय प्रस्थान ठेवणार आहेत. अकरा दिवसांच्या प्रवासानंतर १८ जून रोजी हिरा-मोती यांचे पुण्यात आगमन होणार आहे.

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक

दोन वर्षांच्या खंडांनंतर आषाढी वारीचा सोहळा यंदा हरीनामाच्या गजरात पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. करोनाचे संकट पूर्णपणे दूर झाले नसले तरी वारीमध्ये खबरदारी घेतली जाणार आहे. या प्रस्थानाचे मानकरी मानले जाणारे माऊलींचे मानाचे अश्वद्वय अंकली येथून १० जून रोजी पुण्याकडे वाटचाल सुरू करणार आहेत. १८ जून रोजी पुण्यात पोहोचल्यावर एक दिवसाचा विश्रांतीचा मुक्काम करून मानाचे अश्व माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी २० जून रोजी आळंदीकडे जातील, अशी माहिती अंकली संस्थानचे उर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे यांनी दिली.

अंकली येथील शितोळे सरकारांच्या अश्वांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या अग्रस्थानाचा मान आहे. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या १२ दिवस अगोदर मानाचे अश्वद्वय अंकली येथून प्रस्थान ठेवून अंकली ते आळंदी हा ३१५ किलोमीटरचा मार्ग पायी पार करतात. हिरा आणि मोती अशी माऊलींच्या मानाच्या अश्वांची नावे असून त्यांच्यासोबत जरीपटका आणि गादी असते. अश्वांसह त्यांचेही पूजन केले जाते. त्यानंतर गादी अश्वांवर चढवली जाते. मानाचा जरीपटका स्वाराकडे सांभाळण्यासाठी सुपूर्द केला जातो, असे शितोळे सरकार यांनी सांगितले.

करोना प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा रद्द करण्यात आल्यामुळे दोन वर्षे अंकलीहून मानाच्या अश्वांचे प्रस्थान होऊ शकले नाही. यंदा पालखी प्रस्थान होणार असल्याने समाधान वाटते आहे. परंपरेनुसार ज्येष्ठ शुद्ध एकादशीला (१० जून) मानाचे अश्व प्रस्थान ठेवतील. रोज सुमारे ३० किलोमीटर अंतराची मार्गक्रमणा केली जाईल. वारीदरम्यान माऊलींच्या दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी पुरणपोळीचा महानैवेद्य शितोळे सरकार यांच्याकडून दिला जातो. त्यासाठीच्या शिध्याचे साहित्यही मानाच्या अश्वांसोबत पाठविण्यात येणार आहे.

– उर्जितसिंहराजे शितोळे सरकार

स्वाराची रौप्यमहोत्सवी सेवा

ज्ञानेश्वर माऊलींच्या मानाच्या अश्वांसाठी पारंपरिक पेहरावातील स्वार वारी सोहळ्यात लक्ष वेधून घेतात. एक अश्व स्वाराचा तर एक माऊलींचा असतो. सलग २४ वर्षे पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेणारे तुकाराम कोळी या स्वाराच्या सेवेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पालखी सोहळ्यातील गोल आणि उभ्या रिंगणाच्या वेळी स्वारांचे कौशल्य दिसून येते.