राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुबंई व पुणे या दोन्ही शहरात करोना रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे व अद्यापही यामध्ये भर पडत आहे. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही रोज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, पुण्यातील बुधवार पेठेमधील सेक्स वर्कर महिला देखील करोनामुळे चांगल्याच धास्तावल्याचे समोर आले आहे. किमान एक हजार पेक्षा अधिक महिला पुणे शहर सोडून आपल्या गावी परतल्या आहेत. तसेच, एका महिलेने करोनाच्या धास्तीमुळे प्रसुतीसाठी रुग्णालयात जाणे देखील टाळले असल्याची देखील घटना समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विषाणूंची लागण होईल, या भीतीपोटी आपल्या राज्यातील अनेक भागातील परप्रांतीय नागरिक हजारोंच्या संख्येने त्यांच्या गावी गेल्याचे पाहायला मिळाले. याच भीतीपोटी पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामधील तब्बल हजाराहून अधिक सेक्स वर्कर महिला गावी गेल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा- पुणे : करोनाच्या भीतीमुळे सेक्स वर्कर महिलेने घरातच दिला बाळाला जन्म

बुधवार पेठ परिसरामधील लालबत्ती विभागात काम करणार्‍या अलका गुजनाळ म्हणाल्या की, बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात कित्येक वर्षांपासून मी सेक्स वर्कर्स महिलांच्या प्रश्नावर काम करत आहे. हा भाग आजपर्यंत बंद झालेला, मी तरी पाहिला नाही. पण या करोनामुळे मागील चार महिन्यांपासून हा भाग बंद आहे. त्यामुळे येथील महिलांचे जगणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही विविध स्वयंसेवी संस्था, स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. या भागात शासनाकडून मोठ्या प्रमाणावर मदत झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन

तसेच, या रेड लाईट एरियामध्ये तीन हजाराहून अधिक सेक्स वर्कर महिला आहेत. पण जेव्हा करोना विषाणूचे रुग्ण शहरात आढळून आले. तेव्हा येथील सर्व महिलांच्या मनात एक भीती निर्माण झाला की, आपल्या देखील हा आजार होईल. या भीतीपोटी आपल्या गावी जाणे त्यांनी पसंत केले. आजअखेर जवळपास हजाराहून अधिक महिला गावी गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus more than a thousand women from the red light area of pune returned to the village msr 87 svk
First published on: 04-07-2020 at 16:56 IST