Coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन चिमुकल्यांसह नऊ जण करोनाबाधित

एकूण रुग्ण संख्या १३२ वर, तर आतापर्यंत ५५ जण ठणठणीत बरे झालेले आहेत

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नऊ जण करोना बाधित आढळले असून यात दीड महिन्याच्या चिमुकलीचा आणि चार वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १३२ वर पोहचली असून आत्तापर्यंत ५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज करोना बाधित रुग्ण आढळत असून यात पुण्याची देखील भर पडली आहे. पुणे शहरातील रहिवासी परंतु ते पिंपरी-चिंचवडमधील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज देखील ९ करोना बाधित रुग्णांमध्ये पुण्याच्या राहिवाश्यांचा समावेश आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये दीड महिन्याची चिमुकली आणि चार वर्षाच्या बाळाचा तसेच दोन महिलांचा  समावेश आहे.

हे सर्व करोनाबाधित रुग्ण तळवडे, रुपीनगर, संभाजीनगर, जुनी सांगवी, शिवाजी नगर पुणे, येथील आहेत. दरम्यान यात पिंपरी-चिंचवड हद्दीबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यांच्यावर देखील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत ५ जणांना करोनामुळे मृत्यू झाला असून ५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus nine people infected by coronavirus in pimpri chinchwad msr 87 kjp

ताज्या बातम्या