पुणे : पत्नी आणि मुलीची जबाबदारी न घेता पत्नीला तोंडी तलाक देऊन पळून जाणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कौटुंबिक हिंसाचार, अपहार, मारहाण करणे, धमकावणे तसेच मुस्लीम महिला कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. डी. पाटील यांनी दिले आहेत.

हेही वाचा >>> पुणे : सदाशिव पेठेत अमली पदार्थांची विक्री; एकाला अटक

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
fake documents for passport
पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…

याबाबत एका तरुण विवाहितेने  आकीब अयुब मुल्ला  (वय ३२ रा. कोंढवा) आणि सासरच्यांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबर २०१६ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. विवाहापूर्वी सासरच्यांनी स्थावर मालमत्तेबद्दल सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडे मालमत्ता नव्हती.  तक्रारदार महिला आणि तिच्या मुलीचा खर्चही तिचे आई – वडील करत होते. माहेरहून पैसे आणण्यासाठी पती आणि सासरची मंडळी तगादा लावत होते. त्यासाठी तिला मारहाण, शिवीगाळ केली जात होती.

हेही वाचा >>> पुण्यात मालमत्तांचे सात-बारा उतारे होणार कायमचे बंद… जाणून घ्या कसे?

महिलेला नोकरी करण्यासाठी  दबाव टाकला जात होता.  सासरच्यांनी तिच्या पतीला तलाक देण्यास  प्रवृत्त केले. त्यानुसार तोंडी  तलाक देऊन तो पसार झाला.  त्यानंतर  तिने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुल्ला याच्यासह त्याच्या आई, वडील, बहीण, मेहुण्याविरुद्ध  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुल्ला याला अटक करण्यात आली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.