पत्नीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह मित्राच्या विरोधात चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीने समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकावल्याचे उघडकीस आले.

याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पतीसह त्याच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या नकळत आरोपी पतीने मोबाइलवर चित्रीकरण केले होते. ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. त्यानंतर तिला वेळोवेळी धमकावून तिला बंगळुरू, गोवा; तसेच सिंगापूरला पाठविले होते. आरोपीने महिलेशी विवाह केला. त्यानंतरही त्याने तिला धमकावून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले.