राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार नाकर्ते आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यामुळे राज्यातील एक लाख युवकांचा रोजगार गेला, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली.शहर शिवसेनेच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर चौकात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते.

हेही वाचा >>> पिंपरी : कोट्यवधी खर्चूनही नाशिकफाटा चौकाचा श्वास कोंडलेला ; पादचाऱ्यांसाठी तारेवरची कसरत

माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर संघटक ऊर्मिला काळभोर, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, रेखा दर्शीले, अनंत कोऱ्हाळे, वैशाली मराठे, शैला खंडागळे, अनिता तुतारे, नीलेश मुटके, सचिन सानप, पांडुरंग पाटील, तुषार नवले, रवींद्र खिलारे, संतोष वाळके आदी आंदोलनात सहभागी झाले होते.भोसले म्हणाले,की तळेगावला होणारा अत्यंत महत्त्वाकाक्षी प्रकल्प शिंदे सरकारच्या खांद्यावर बंदूक ठेवून गुजरातला पळवण्यात आला, हे निषेधार्ह आहे.