पुणे : खेड शिवापूर टोलनाका परिसरात मोटारीतून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आली. पोलिसांनी रोकड जप्त केली असून, राजगड पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरु होते. प्राथमिक चौकशीत मोटारीतून जप्त करण्यात आलेली रोकड पाच कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा >>> शिरूरमधील लढत दोन ‘राष्ट्रवादीं’मध्ये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका मोटारीतून मोठ्या प्रमाणावर रोकड नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्री आठच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्याजवळ संशयित माेटार थांबविण्यात आली. मोटारीत मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले. रोकड कुठे नेण्यात येणार होती, तसेच कोणाची आहे, याबाबतची माहिती चाैकशीत न मिळाल्याने पोलिसांनी रोकड जप्त केली. राजगड पोलीस ठाण्यात रोकड नेण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक चौकशीत मोटारीत पाच कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते.