लोणावळा-पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत बुधवारी दरड कोसळली. मोठ्या प्रमाणात दगड आणि माती खिंडीतील अरुंद रस्त्यावर पडल्याने अर्धा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

दुधिवरे खिंडीत मोठ्या संख्येने पर्यटक जातात. पवनानगर परिसरातील सर्व गावांना लोणावळ्यात येण्यासाठी दुधिवरे खिंड जवळचा मार्ग आहे. खिडींतील रस्त्यावरुनपर्यटक पवना धरणाकडे जातात. गेल्या २४ तास लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस झाला. खिंडीतील कपारीतील दगड आणि माती रस्त्यावर पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. सुदैवाने खिंडीतून कोणी जात नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. खिंडीतील कपारातील दगड सैल झाले असून नागरिकांनी मावळातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. खिंडीत दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेसीबी यंत्राच्या सहायाने दगड, माती हटविण्यात आली. त्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. दुधविरे खिंडीतील रस्ता धोकादायक झाला असून पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे कामे करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी केली होती