पुणे: तुळशीबागेत शुकशुकाट; गिरीश बापट यांच्या निधनानंतर व्यापाऱ्यांचा उस्फूर्त बंद

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गजबलेल्या तुळशीबागेत बुधवारी शुकशुकाट होता.

Girish Bapat traders spontaneously shut down गिरीश बापट
गिरीश बापट यांच्या निधनानंतर व्यापाऱ्यांचा उस्फूर्त बंद

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गजबलेल्या तुळशीबागेत बुधवारी शुकशुकाट होता. व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांच्या समस्या सोडविणाऱ्या गिरीशभाऊंचे निधन झाल्याचे समजताच तुळशीबागेसह व्यापारी पेठेतील व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी बंद पाळून आदरांजली वाहिली.

तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता परिसरात गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी कायम गर्दी असते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. दुपारी खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याचे समजताच व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने बंद केली. दिवसभर व्यापार बंद ठेवला, असे तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पंडीत यांनी सांगितले. बापट यांनी तुळशीबाग परिसरातील छोटे व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांच्या समस्या सोडविल्या. व्यापाऱ्यांना कायम सहकार्य केले. आमच्या तक्रारी, समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांच्या पाठीशी ते कायम राहिले. व्यापारी पेठेतील कार्यकर्त्यांना त्यांनी कायम सहकार्य केले. त्यांचे निधन झाल्याचे समजताच व्यापाऱ्यांनी उस्फूर्त बंद पाळला, असे पंडीत यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 21:25 IST
Next Story
पुणे: गिरीश बापट अनंतात विलीन
Exit mobile version