ढोल, ताशांच्या दणदणाटात आणि जोरदार घोषणाबाजीने झालेल्या मनसेमय वातावरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी मंगळवारी त्यांचा उमेदवारीअर्ज दाखल केला. अर्ज सादर करण्यापूर्वी मनसेने काढलेल्या रॅलीमुळे सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते.
मनसेच्या नारायण पेठेतील कार्यालयापासून दुपारी पायगुडे यांच्या भव्य रॅलीचा प्रारंभ झाला. पक्षाचे शहराध्यक्ष बाळा शेडगे, प्रकाश ढोरे, तसेच शर्मिला ठाकरे, आमदार शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, सरचिटणीस अनिल शिदोरे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रिटा गुप्ता, सविता पायगुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीचे वाटेत ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. तसेच फटाक्यांची आतषबाजीही केली जात होती. कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणांमुळेही मनसेच्या वातावरणाची चर्चा होती.
अर्ज भरण्यासाठी पायगुडे रिक्षातून आले. मी सर्वसामान्य कार्यकर्ता असून माझ्या व्यावसायिक जीवनाची सुरुवातही मी रिक्षा व्यवसायातूनच केली. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी देखील मी रिक्षातूनच आलो आहे, असे पायगुडे यांनी या वेळी सांगितले. पुणेकर नागरिक मनसेच्या आणि दीपक पायगुडे यांच्या पाठीशी उभे राहतील आणि मनसेला विजयी करतील, असा विश्वास या वेळी पत्रकारांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांचा करिष्मा सर्वत्र आहे. त्यामुळे मी निश्चितच विजयी होईल, असे पायगुडे यांनी या वेळी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2014 रोजी प्रकाशित
मनसेच्या पायगुडे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
दीपक पायगुडे यांनी मंगळवारी त्यांचा उमेदवारीअर्ज दाखल केला. अर्ज सादर करण्यापूर्वी मनसेने काढलेल्या रॅलीमुळे सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते.

First published on: 26-03-2014 at 03:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak paygude mns election