पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रास्त भाव दुकानांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करावा. तसेच, नवीन दुकानांचा जाहीरनामा रद्द करून सद्यस्थितीत दुकानदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे : मिळकत कर भरण्याची शेवटची संधी; क्षेत्रीय कायार्लये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय

पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त त्रिभुवन कुलकर्णी यांच्याकडे फेडरेशनने निवेदन दिले आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात काही कारणास्तव दुकाने बंद झाली आहेत. त्या ठिकाणी प्रशासनाकडून नवीन दुकानांचे प्रस्ताव अर्ज टाकण्यात आले आहेत. मात्र, सद्यस्थितीत स्वस्त धान्य दुकानदारांकडे अन्नसुरक्षा व अंत्योदय कार्डचे ५० ते ५०० पर्यंतच लाभार्थी आहेत. कमी लाभार्थी संख्येमुळे दुकानदारांची उपजीविका भागेल, एवढेही उत्पन्न मिळत नाही. पुरवठा विभागाने प्रति दुकानात किमान चार ते सहा हजार लाभार्थी संख्येचा समावेश करावा. शासनाकडून धान्य पुरवठा वेळेत देण्याची व्यवस्था करावी, असे या निवेदनात नमूद आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand of fair price shopkeepers to fix revised figure pune print news bej 15 dpj
First published on: 30-12-2022 at 22:44 IST