पुणे : ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे यांचे अल्प आजाराने आज दुपारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रात त्यांनी काम केले.

जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले. त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे शिखरे रंगरेषांची आणि नीलधवल ध्वजाखाली हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब

परांजपे यांना ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार तसेच ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.