लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निष्णात वकील आहेत. कायदे समजणारे आहेत. वर्षानुवर्षे त्यांनी वकिली केला आहे. ते कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाहीत. १६ आमदारांच्या आपत्रतेबाबत न्यायालयाने रिजनेबल टाईम म्हटले आहे. रिजनेबल टाईमचा अर्थ स्पष्टपणे अध्यक्ष यांना समजतो. त्यामुळे ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Prakash Awades rebellion cools down Chief Minister eknath shinde courtesy succeeds
प्रकाश आवाडेंचे बंड थंड, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल
Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
rajan vichare emotional appeal
अन्याय सहन केलात… आता लढायला सज्ज व्हा; राजन विचारे यांचं भावनिक आवाहन 
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

न्यायालयाच्या निर्णयानंतर १६ आमदारांना अपात्र करण्याबाबत ठाकरे गटाचे नेते विधानसभा अध्यक्ष यांना भेटण्यासाठी जाणार असल्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, जे काही चालले आहे ते कोणत्या लोकशाहीत बसणारे आहे. विधानसभा अध्यक्ष यांना घेराव घालू, चालू देणार नाही, फिरू देणार नाही, असे धमकावणे चुकीचे आहे.

आणखी वाचा-Akola Dangal : महाराष्ट्रात सातत्याने दंगली का उसळतात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही संस्था…”

दबावातून विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात. तुम्ही खरे असेल तर तुमचा मुद्दा मांडा. खरे तर तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी तुमची बाजू कमकुवत आहे. पण, अशा प्रकारची भाषा वापरणे सुरू आहे. विधानसभेचे अध्यक्ष निष्णात वकील आहेत. कायदे समजणारे आहेत. वर्षानुवर्षे वकिली केली आहे. कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाहीत. न्यायालयाने रिजनेबल टाईम म्हटले आहे. त्याचा टाईम स्पष्टपणे अध्यक्ष यांना समजतो. त्यामुळे ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील. पण, मला विश्वास आहे कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी अध्यक्ष दबावाला बळी पडणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.