पुणे प्रतिनिधी: भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला तीन दिवस होत नाही तोवर पोटनिवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाली असून पोटनिवडणुक लढविण्याची इच्छा काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, गिरीश बापट यांना जाऊन तीन दिवस झाले असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामधून स्थिर तर होऊ द्या. राजकारण तर होताच राहील. पण इतक असंवेदनशील होऊ नये. अशी भूमिका मांडत काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना सुनावले.

भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घेतली.त्यावेळी गिरीश बापट यांच्या सोबत संसदेतील कामकाजातील आठवणींना उजाळा दिला.

आणखी वाचा- गिरीश बापट यांचे सर्व पक्षीय नेत्याशी जिव्हाळ्याचे संबध होते: अजित पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
supriya sule

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गिरीश बापट यांना संसदेत थोडाच काळ घालवत आला.त्या कालावधीत गिरीश बापट यांनी सभागृहातील सर्व खासदार सोबत चांगला संवाद राखण्याच काम केले.तसेच आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे असलो.तरी देखील त्यांच्याकडे कोणतही काम घेऊन गेल्यावर त्यांनी कायम मार्गदर्शन करण्याच केले आहे. गिरीश बापट यांनी कधीच अंतर येऊ दिले नाही.त्यामुळे आम्ही एक उत्तम मार्गदर्शक गमवून बसलो असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.