scorecardresearch

गिरीश बापट यांचे सर्व पक्षीय नेत्याशी जिव्हाळ्याचे संबध होते: अजित पवार

खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली भेट

Ajit Pawar met MP Girish Bapat family
अजित पवार यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

पुणे प्रतिनिधी: राजकीय जीवनात गिरीश बापट यांचे सर्व पक्षीय नेत्याशी जिव्हाळ्याचे संबध राहिले. पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप हा पक्ष पुढे नेण्याच काम खर्या अर्थाने त्यांनी केले आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकीय जीवनात पोकळी निर्माण झाल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

खासदार गिरीश बापट यांच दोन दिवसापूर्वी निधन झाल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार,भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे,भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक या मंडळीनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.तसेच यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळीनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी अजित पवार म्हणाले की,गिरीश बापट आणि माझ्यात विधिमंडळाच्या कामकाज करतेवेळी शहराच्या अनेक प्रश्ना बाबत चर्चा झाल्या.शहराच्या विकासा बाबत ते नेहमी अग्रेसर असायचे.आमचे पक्ष वेगळे होते.पण आमचा संवाद कायम होता. नगरसेवक,आमदार, पालकमंत्री आणि खासदार असा गिरीश बापट यांचा प्रवास राहिला.त्यामुळे गिरीश बापट यांचा आजपर्यंतचा प्रवास पाहता त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही.अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा- “महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सावरकर गौरव यात्रा”, अजित पवार यांचा आरोप

तसेच ते पुढे म्हणाले की,गिरीश बापट साहेब विधिमंडळाच्या कामकाजावेळी बाकरवडी घेऊन यायचे आणि आम्हाला लॉबीमध्ये द्यायचे.आमच्यासह कर्मचारी वर्गाला देखील ते बाकरवडी देत असायचे.तसेच सभागृहात कधी काही झाल तर खडसावून सांगायचे. अशा आठवणीं यावेळी त्यांनी सांगितल्या.

खासदार म्हणून निवडून गेल्यावर सहा महिन्यात पुन्हा येथे आलो: अजित पवार

गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार,भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे,भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक या मंडळीनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.तसेच यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळीनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला.

त्यावेळी अजित पवार हे १९९१ साली खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यावेळच्या आठवणीं सांगताना म्हणाले की,मी दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेलो.त्यावेळी तेथील सुरुवातीची सहा महिने पाहिल्यावर कुठ आल्यासारख झाले.त्यानंतर मी सहा महिन्यात पुन्हा येथे आलो.दिल्लीतील वातावरण वेगळ असून रात्रीची दिल्ली तर वेगळीच असते.अशी आठवण देखील अजित पवार यांनी सांगितली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:58 IST

संबंधित बातम्या