लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नाना पेठेतील एका अमली पदार्थ विक्रेत्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलीस दारावर आल्याचे पाहून अमली पदार्थ विक्रेता जागेवर कोसळला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर, तसेच विक्रेत्यांविरुद्ध (पेडलर्स) कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी सराईत अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी सुरू केली असून, नाना पेठेतील अमली पदार्थ तस्कर त्याच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले. तेव्हा ५२ वर्षीय अमली पदार्थ विक्रेता दारावर पोलीस आल्याचे पाहताच कोसळला. बेशुद्धावस्थेतील अमली पदार्थ विक्रेत्याला रास्ता पेठेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

आणखी वाचा- “शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आप्तधर्म म्हणून तो निर्णय घेतला असेल तर…” नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी त्याच्या घराची ‌झडती घेतली. तेव्हा घरातून काही ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.