शिरुर : शिरुर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाला असल्याने शिरुर नगरपरिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेतून गुरुवारपासून (१५ मे) दिवसाआड पुरवठा केला जाणार आहे.‘कोल्हापूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. सद्य:स्थितीमध्ये बंधाऱ्यात उपलब्ध असणारा पाणीसाठा काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून १५ मेपासून शिरुर नगरपरिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेतून शहराला एक दिवसाआड पुरवठा केला जाणार आहे.’ असे शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले.

‘नळ कनेक्शनधारकांनी नळाला तोट्या लावलेल्या नाहीत, त्यांनी नळाला तोट्या बसवून घ्याव्यात. नळ कनेक्शनला विजेवरील मोटार लावू नयेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याच्या नियमित वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे’ असेही त्यांनी सांगितले.‘सध्या बंधाऱ्यात १० ते १२ दिवस पुरेश एवढा पाणीसाठा आहे. शहरातील ३२ हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली आहे.’ असे मुख्याधिकारी पाटील आणि पाणीपुरवठा विभागाचे भूषण कडेकर यांनी स्पष्ट केले.

शिरुर शहराचा पिण्याचा पाण्यासाठी पहिले आवर्तन ११ जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले. त्यानंतर २४ मार्च ते २८ मार्च २०२५ या काळात दुसरे पाणी आवर्तन झाले. शिरुरच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ५५ दशलक्ष घनफूट आहे. उन्हाळ्यात बंधारा पाण्याने भरल्यावर हे पाणी ४५ ते ५० दिवस पुरते. बंधारातील काही पाण्याचे बाष्मीभवन, तर काही पाणी शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे बंधारातील पिण्याचे पाणी कमी होते. दरम्यान, आमदार माउली कटके यांनी बंधाऱ्यात पाणी साेडण्याची मागणी केली आ