पुणे : चिंचवड येथील वाल्हेकरवाडी (पेठ क्रमांक ३०) येथील व्यापारी संकुलातील २० दुकानांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यासाठी २६ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. पीएमआरडीए कार्यक्षेत्रात येत असलेल्या या व्यापारी संकुलातील एकूण ३१ दुकानांपैकी ११ दुकानांकरिता जानेवारी महिन्यात ई-लिलावाची प्रक्रिया करण्यात आली होती. आता त्याच व्यापारी संकुलातील उर्वरित २० वाणिज्य दुकाने ८० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ मे रोजी होणाऱ्या ई-लिलावाद्वारे भाडेपट्ट्याने वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक लिलावधारकांना शासनाच्या https://eauction.gov.in  या संकेतस्थळावरुन २४ एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. लिलावाची संपूर्ण प्रकिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या सर्व लिलाव प्रक्रियेची संपूर्ण माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर (https://pmrda.gov.in) उपलब्ध करुन देण्यात आली आहे, तर लिलाव प्रक्रिया https://eauction.gov.in या संकेतस्थळावरुन होणार आहे. त्यासाठी इच्छुक नागरिकांनी लिलाव प्रक्रीयेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E auction of 20 shops deadline to apply till 26th april pune print news psg 17 ysh
First published on: 30-03-2023 at 19:40 IST