पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) विद्यार्थ्यांच्या संघाला आयजीईएम स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. बारा विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या संघाने दोन जिवाणूंना एकत्र वाढवून त्यांच्याद्वारे ब्युटानॉल हे इंधन तयार करण्याचा प्रकल्प सादर केला होता.विशेष म्हणजे, आयसर पुणेला या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन (आयजीईम) फाउंडेशनतर्फे ४ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी दिली जाते. यंदा या स्पर्धेत दोन जिवाणूंना एकत्र वाढवून रासायनिक संयुगे संश्लेषित करण्यासाठीचे प्रारूप तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते. तसेच यामध्ये पेट्रोकेमिकल्सद्वारे कार्बन उत्सर्जन होण्याची पद्धती टाळणे आवश्यक होते. त्यानुसार गेले काही महिने ‘आयसर पुणे’चा संघ सिनबॅक्टरी या प्रकल्पावर काम करत होता. या संघात अश्विन उदय, मिसाल बेदी, संजना वसंत, अश्ली जैन, नमस्वयं गोमथी शंकर, लिखित चंद्रगिरी, विदिशा हाटे, अर्श शेख, सूर्य नारायण, आकाश दत्ता, आर्य नरनपट्टी आणि जेसन जॉबी या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2021 रोजी प्रकाशित
आयजीईएम स्पर्धेत ‘आयसर- पुणे’ला सुवर्णपदक
इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन (आयजीईम) फाउंडेशनतर्फे ४ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-11-2021 at 01:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eiser pune gold medal in igm competition akp