पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे यांना सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ देण्यास या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच कर्मचारी महासंघानेही विरोध केला आहे.गावडे ३१ ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत असून, त्यांचे त्याच ठिकाणी मानधनावर नियुक्ती करण्यासाठी राजकीय नेत्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना मुदतवाढ देण्यास अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विरोध केला असताना, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने विरोध केला आहे.

हेही वाचा : पिंपरी: टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांचा बोनसचा तिढा सुटेना

महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी याबाबतचे निवेदन आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे. गावडे यांच्याविरोधात अग्निशमन विभागातून तक्रारी आलेल्या आहेत. महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने त्यांच्या कारभाराबाबत आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे गावडे यांना मुदतवाढ देणे योग्य नाही, असे महासंघाने पत्रात नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.