महाराष्ट्र केसरी आणि राज्य सरकारने छत्रपती पुरस्काराने सन्मानित केलेले पुण्यातील पैलवान दत्तात्रय गायकवाड यांची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. पुण्यातील सत्र न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. दोन वर्षांपूर्वी एका प्रकरणात गायकवाड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वडकी येथे १९ डिसेंबर २०१६ रोजी शिवाजी गायकवाड यांच्यावर कोयता, तलवार, लोखंडी गजाने मारहाण करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी लखन ऊर्फ लक्ष्मण मोडक, सचिन फाटे, संतोष मोडक, सोमनाथ गायकवाड, दीपक मोडक, महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड, पंडित मोडक आणि विवेक मोडक या आठ जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.