डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला पाच दिवस उलटले, तरी पुणे पोलीस त्यांच्या मारेकऱयांचा शोध घेऊ शकलेले नाहीत. पोलिसांच्या तपासाला योग्य दिशा मिळत नसल्याची कबुली राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल १९ पथके तयार केली आहेत, पण त्यांच्या हाती अजूनही मारेकरी लागलेले नाहीत. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी कुणाला अटक करता येईल इतके सबळ पुरावे हाती लागलेले नाहीत. पोलिसांनी आठ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, पण त्यातील दृश्ये खूपच अस्पष्ट आहेत. असेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.