लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या’ हा संदेश जगभरातील लोकांना देण्यासाठी पिंपळे निलखमधील विवेक सोनवणे हे पत्नी व दोन मुलांसह मोटारीने पिंपरी-चिंचवड ते लंडन असा प्रवास करणार आहेत. बुधवारी त्यांनी या प्रवासाला प्रारंभ केला. हे कुटुंब ३१ देशांमध्ये प्रवास करणार आहे.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी झेंडा दाखवून या धाडशी प्रवासास शुभेच्छा दिल्या. चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर पुतळ्याला अभिवादन करून १२० दिवसांच्या व ३१ देशांमधून होणाऱ्या या प्रवासास आरंभ करण्यात आला. वसुधैव कुटुम्बकम् आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या, हा संदेश ते जगभरातील नागरिकांना देणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, आरती चौंधे, मोरेश्वर शेडगे यावेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-तूरडाळ १७० रुपयांवर; दोन महिन्यांत किलोमागे ५० रुपयांची वाढ

हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सोनवणे कुटुंबाची भेट घडवून देणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.