शिरुर : आम्ही आमच्यात इतके गुरफटलो आहे की समाज ,नातीगोती सहवास, सगळे विसरलो आहे .ऐकमेकांना वेळ द्या, एकमेकांना भेटा, एकमेकांशी बोला .नाती जपा असे आवाहन प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले . शिरुर येथील कटारिया कलेक्शनचे प्रमुख सुरेश कटारिया यांचे नूकतेच निधन झाले . त्यानिमित्त आयोजित श्रध्दांजली सभेत शिंदे बोलत होते .

यावेळी शिंदे म्हणाले की आज काळ लोकांना श्वास घ्यायला व लोकांच्या सुख दु:खात जायला वेळ नाही. लोकांना बोलायला वेळ नाही .मोबाईल मुळे माणस अस्वस्थ झाली आहेत. मोबाईल आपल्यासाठी आहे का मोबाईलसाठी आपण आहे असा प्रश्न विचारुन अस्वस्थ राहू नका . ऐकमेकांना वेळ द्या एकमेकांना भेटा एकमेकांशी बोला असे शिंदे म्हणाले .

आम्ही आमच्यात इतके गुरफटलो आहे की समाज ,नाती गोती, सहवास सगळे विसरलो आहे. .आपल्या आई वडिलांशी बोला जवळची नाती सांभाळा . आपण यंत्र नाही माणूस आहे हे कधी विसरु नका .आयुष्य हे क्षणभंगुर आहे .इतरांच्या तुलनेत जगू नका . आपणांस आपल्या जगण्याचे कौतुक वाटु द्या .आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञ असले पाहीजे .असे ही ते म्हणाले सुरेश कटारिया यांनी उत्तम व्यवसाया बरोबर मैत्र ही जमविले आनंदी पणाने ते जीवन जगल्याचे शिंदे म्हणाले .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी महेश सुरेश कटारिया यांच्या परिवाराचा वतीने सुरेश कटारिया यांच्या जीवनाचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवली . धनराज कटारिया , रमणलाल कटारिया , विलास कटारिया , संतोष कटारिया , महेश कटारिया , नीलेश कटारिया , पवन कटारिया , ज्ञानगंगा विश्व विद्यालयचे प्रमुख डॉ . राजेराम घावटे ,सुनील घावटे , सुवालाल पोखरणा , नवनाथ फरगडे आदी उपस्थित होते .