पुणे : मी तुला शारीरिक सुख देण्यास अकार्यक्षम असून तू माझ्या वडीलांसोबत संबध ठेवून आम्हाला मुले दे,त्यावर मुलाच्या वडीलांनी सुनेच्या बेडरूममध्ये घुसून संबध ठेवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.तर या प्रकरणातील आरोपी सासरे हे निवृत्त पोलिस अधिकारी आहे.तर या प्रकरणी 30 वर्षीय पीडित सुने ने सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.तर या प्रकरणी आरोपी पती,आरोपी सासरे आणि आरोपी सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित सुन आणि आरोपी पती यांचा मे 2025 मध्ये लग्न झाले.त्यानंतर दोघे जण बाहेर फिरण्यास गेले.मात्र पती तिच्या सोबत बोलत नव्हता,सतत फोनवर असायचा,त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.त्यावेळी आरोपी म्हणाला,मी तुझ्यासोबत संबध ठेवण्यास अकार्यक्षम असून तू माझ्या वडीलांसोबत संबध ठेवून आम्हाला मुल दे,असे त्याने सांगितले.हे ऐकून पीडित सुनेला धक्का बसला.त्यानंतर ते बाहेर गावावरून पुण्यातील घरी आल्यावर पीडित सुन तिच्या बेडरूममध्ये बसली होती.

त्यावेळी आरोपी सासरे हे तिच्या रुममध्ये घुसून संबध ठेवण्याचा प्रयत्न करू लागले.त्यावर पीडित सुने ने विरोध केला.याबाबत सासूला सांगितल्यावर,सासू ने देखील पती आणि मुलाला साथ दिली.त्यामुळे सुन दुसर्‍या दिवशी तिच्या घरी निघून गेली.तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितले.त्यानंतर आमच्याकडे तक्रार येताच या प्रकरणी पती, सासरे आणि सासू या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.