पुणे : कल्याणीनगरमधील मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीत सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी उंची शिडीचा वापर करुन अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली. आयटी पार्कच्या इमारतीच्या गच्चीवर असलेल्या चौघांची सुटका केली. मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीत सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. जवानांनी घटनास्थळी घाव घेतली. मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीतील आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी उंच यांत्रिक शिडीचा वापर केला. आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची जवानांनी सुटका केली. इमारतीच्या गच्चीवर चौघेै जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी उंच शिडीचा वापर करुन त्यांना सुखरुप खाली आणले. तासाभरानंतर आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर आयटी पार्क परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.



