पुणे : वानवडी भागात महावितरणच्या रोहित्राला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. वानवडीतील आझादनगर परिसरात रुबी हाॅल क्लिनीकजवळ असलेल्या महावितरणच्या रोहित्राने दुपारी अडीचच्या सुमारास पेट घेतला. आग भडकल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला नागरिकांनी दिली.
हेही वाचा >>> शिवसेना ठाकरे गटाच्या पिंपरी महिला संघटिकेसह ८ जणांची हकालपट्टी
अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रशांत गायकर, कैलास पायगुडे, दाभाडे आणि सहकारी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पंधरा ते वीस मिनिटात आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
