विमाननगर भागातील आयटी बिझनेस हब या माहिती-तंत्रज्ञान कंपनीत मंगळवारी दुपारी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. आयटी बिझनेस हबमधील दोन हजार कर्मचाऱ्यांना सुरक्षित हलविण्यात आल्याने अनर्थ टळला.

हेही वाचा >>> पिंपरी : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने अभियंता तरुणीची २४ लाखांची फसवणूक

विमाननगर भागातील आयटी बिझनेस हबमधील एका मजल्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पाऊण तासात आग आटोक्यात आली. आग लागल्याची माहिती मिळताच माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. आयटी बिझनेस हबमधील तळघरातील खोली इलेक्ट्रीक खोलीत आग लागली होती. धूर नवव्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने घबराट उडाली. आयटी हबमधील दोन हजार कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.