लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: फुरसुंगीतील कचरा डेपोतील कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. कचरा पेटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. आगीमागचे कारण समजू शकले नाही. कचरा डेपोतील एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या कचऱ्याला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या असतात. उन्हाळ्यात साठलेल्या कचऱ्यातील उष्णता वाढून आग लागण्याच्या घटना घडतात, असे महापालिकेचे आरोग्य सेवक सचिन चव्हाण यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पूर्वी फुरसुंगीतील कचरा डेपोत आग लागण्याची घटना घडली होती. कचरा डेपोतील आग आटोक्यात आल्यानंतर कचरा धुमसत असतो. आग पूर्णपणे आटोक्यात येण्यास किमान एक ते दोन दिवस लागतात. कचऱ्यात ज्वलनशील वस्तू असतात. त्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य होत नाही. कचरा डेपोत यापूर्वी आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे तेथे कायमस्वरुपी पाण्याचे टँकर ठेवण्यात आले आहेत.