scorecardresearch

Premium

VIDEO: फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला.

Fireworks Pimpri-Chinchwad Diwali caused fire incidents 18 different places
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

पिंपरी: दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली जात आहे. लक्ष्मीपूजनानंतर रविवारी शहर, उपनगरात मोठ्या प्रमाणावर केलेल्या आतिषबाजीमुळे शहरातील विविध १८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ११ ठिकाणी घरांना आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला.

दिवाळीनिमित्त फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत दिवसभर फटाके फोडले जात आहेत. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. रविवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या आतिषबाजीमुळे शहरातील १८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

हेही वाचा… प्रवाशांसाठी खुशखबर! गर्दी कमी करण्यासाठी दिवाळीत रेल्वेच्या ५०० विशेष गाड्या

जुनी सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड, फुगेवाडी, कासारवाडी, काळेवाडी, भोसरीतील पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली होती. रावेत येथे एका दुकानाला आग लागली. चिखलीत चौथ्या मजल्यावरील घराला आग लागली. वडमुखवाडीत सलूनच्या दुकानाला आग लागली. आकुर्डी, एम्प्यायर इस्टेट येथील सातव्या मजल्यावरील घराला आग लागली. पिंगळेसौदागर येथे झाडाला आग लागली होती. मोरवाडीत घराला तर मोशीत एका कंपनीला आग लागली. पिंपरी बाजारपेठेतील एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. दापोडीत एका घराला आग लागली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला.सातत्याने येणाऱ्या वर्दीमुळे अग्निशमन विभागाच्या जवानांची मात्र मोठी धावपळ झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fireworks in pimpri chinchwad city on the occasion of diwali caused fire incidents in 18 different places pune print news ggy 03 dvr

First published on: 13-11-2023 at 12:17 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×