Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

पुणे : स्वच्छ आणि शाश्वत पद्धतीने वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून अण्विक संमीलन (न्यूक्लिअर फ्युजन) तंत्रज्ञानासाठी ‘प्रोजेक्ट संलयन’ हा प्रकल्प आकुर्डीच्या डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने हाती घेतला आहे. अण्विक संमीलन तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण जगभरात साध्य झालेले नसताना उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्र येऊन खासगी पद्धतीने पहिल्यांदाच असा प्रकल्प राबवत आहेत. पंधरा वर्षे कालावधीच्या प्रकल्पासाठी सुरुवातीला दहा कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रभात रंजन आणि प्रकल्पातील गुंतवणूकदार अल्बोट टेक्नॉलॉजीजचे डॉ. आकाश सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. न्युक्लिअर फ्यूजन या विषयावर पीएच.डी. केलेल्या काही पहिल्या भारतीयांमध्ये डॉ. रंजन यांचा समावेश होतो. त्यांनी केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या टायफॅक या संस्थेचे प्रमुख म्हणून काम केले आहे. तर डॉ. आकाश सिंह अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये कार्यरत आहेत. दोन किंवा अधिक अणू एकत्र तयार होणाऱ्या ऊर्जेला न्यूक्लिअर फ्यूजन किंवा अण्विक संमीलन म्हटले जाते. अण्विक संमीलनासंदर्भात जगभरात अनेक दशके काम सुरू आहे. मात्र या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण शक्य झालेले नाही.

प्रकल्पाबाबत डॉ. रंजन म्हणाले, की अण्विक संमीलन तंत्रज्ञानाच्या मदतीने अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा येत्या काळात मोठा उपयोग होऊ शकतो. थोरिअमचे युरेनियममध्ये रुपांतर करून अणु ऊर्जानिर्मितीसह वैद्यकीय समस्थानिके (मेडिकल आयसोटोप) तयार करण्यास सक्षम न्यूट्रॉन स्रोत प्रदान करणारा हा प्रकल्प आहे. अण्विक संमीलन हे अतिशय सुरक्षित असते. या प्रकल्पाद्वारे अण्विक संमीलनाच्या योग्य वातावरण निर्मितीसाठी सूर्याच्या गाभ्याच्या सुमारे ६ ते १२ पट तापमान तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. या प्रकल्पात संशोधन आणि विकासाची भूमिका महत्त्वाची असल्याने २०३५ पर्यंतचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सरकारी यंत्रणांशीही चर्चा सुरू आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठात शास्त्रज्ञ आणि अभियंते काम करत आहेत.

प्रकल्पाचा फायदा..

  •    ५०० मेगावॉट एवढय़ा ऊर्जेची निर्मिती
  •    सुरक्षित, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जानिर्मिती
  •    थोरियमचे युरेनियममध्ये रुपांतर करणे शक्य
  •    अणू कचऱ्याचे व्यवस्थापन