पुणे : गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मंगळवारी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रूप विराजमान झाले. फुलांच्या शेषनागाच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गाभाऱ्यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारून सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.

हेही वाचा – पुणे : ऑनलाइन औषध खरेदी करताना फसवणूक; आरोपीला पश्चिम बंगालमध्ये अटक

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे व सहकाऱ्यांनी स्वराभिषेकातून गणराया चरणी सेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी झाले.

हेही वाचा – पिंपरी : मित्राची वाढती प्रतिष्ठा बघवेना… आणि असा काढला मित्राचाच काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे गाभाऱ्यासह मंदिरावर फुलांच्या माध्यमातून शेषनागाच्या प्रतिकृतींची आरास करून श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार मंगळवारी साजरा करण्यात आला.