परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी पुस्तकाचे ‘भारत मार्ग’ या नावाने मराठी अनुवाद करण्यात आले आहे. या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन जयशंकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (२८ जानेवारी) होणार आहे.

भारतीय विचार साधना प्रकाशन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे कोथरूडमधील मयूर कॉलनीतील बालशिक्षण सभागृहात दुपारी चार वाजता प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विदेश विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले या वेळी उपस्थित राहणार आहेत. सरिता आठवले यांनी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.

हेही वाचा – गोष्टींच्या शाळेत विद्यार्थी रममाण; साताऱ्यातील शिक्षक बालाजी जाधव यांचा अनोखा उपक्रम

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, “उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००८ मधील जागतिक आर्थिक संकटापासून २०२० च्या करोना महासाथीपर्यंतच्या कालखंडात जागतिक व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूप आणि त्याचे नियम बदलत आहेत. ‘जगातील सर्व प्रमुख शक्तींसोबत सर्वोत्तम संबंध’ हे उद्दिष्ट उत्तमरित्या पुढे नेणे हा भारतासाठी त्याचा अर्थ आहे. त्यासाठी अधिक धाडसी आणि स्वतंत्र दृष्टिकोन आवश्यक आहे. जागतिक उलथापालथीच्या काळात भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ‘द इंडिया वे’ या पुस्तकामध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या आव्हानांचे विश्लेषण आणि संभाव्य धोरणात्मक प्रतिसादांचे वर्णन केले आहे. जगाच्या व्यासपीठावर महत्त्वपूर्ण जागा पुन्हा प्राप्त करण्यासाठी इतिहास आणि परंपरा यांचे संदर्भ घेऊन त्यांनी मांडणी केली आहे.