ईडीच्या तपासात अडथळा आणणाऱ्या तिघांना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले तेव्हा त्यांच्या तपासात अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही. उलट पुरावा नष्ट केला. तपासात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत रात्री पिंपरी पोलिसांनी अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाला आणि भावाच्या एका मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, आणखी दोन महिलांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना रात्री नोटीस बजावून सोडून देण्यात आले होते.

हेही वाचा >>>पुणे: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या चोरीला; भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरी

शुक्रवारी पिंपरी-चिंचवड मधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानींच्या घरावर ईडीने रेड टाकली. मूलचंदानींसह संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे १२४ कर्ज वाटप केल्याचे आणि यातून ४०० कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी सह पाच जणांना अटक ही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि शुक्रवारी ईडी ने छापा टाकला. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेविदारांच्या कोट्यवधींचा पैसा अडकून आहे. सध्या अमर मूलचंदानी हे पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असून ते ईडी ने त्यांना ताब्यात घेतलेले आहे. 

हेही वाचा >>>पुणे: टोमॅटो, काकडी, फ्लाॅवरचे भाव झाले स्वस्त; अंबाडी, पालकाचे दर कडाडले

पिंपरीतील दी सेवा विकास सहकारी बँकेत बेकायदा कर्जवाटप आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कारवाई केली होती. आरबीआयने दोन महिन्यांपूर्वी सेवा बँकेचा परवाना रद्द केला होता. बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (२८ जानेवारी) ईडीच्या पथकाने पिंपरीतील अमर मूलचंदानींचे गणेश हाॅटेल; तसेच तपोवन मंदिराजवळील मिस्ट्री पॅलेस या इमारतीतील मूलचंदानी यांच्या निवासस्थानी कारवाई केली. ईडीचे अधिकारी आणि पथक सकाळी साडेसहाच्या सुमारास मूलचंदानी यांच्या निवासस्थानी पाेहचले. तेव्हा सदनिकेचा दरवाजा बंद होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा वाजविला. तेव्हा सदनिकेतून प्रतिसाद देण्यात आला नाही. दरवाजा वाजविण्यात आल्यानंतर उघडण्यात आला नाही. अखेर सकाळी सव्वा आठच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. तेव्हा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यानंतर मूलचंदानी कुटुंबीयांनी दरवाजा उघडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीचे अधिकारी तसेच पथक दोन तास मूलचंदानी यांच्या निवासस्थानसमोर थांबले होते. या काळात मूलचंदानी कुटुंबीयांनी पुरावे नष्ट करुन तपासात असहकार्य केल्याचे ईडीचे अधिकारी श्रीवास्तव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.