scorecardresearch

बारामती: केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर; विरोधकांनी एकत्र येऊन विचार करावा, माजी मंत्री शरद पवार यांचे मत

केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असून, अधिवेशनात विरोधकांना बोलून द्यायचे नाही आणि सभागृहात गोंधळ करून हवी ती विधेयके मंजूर करून घेण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे.

बारामती: केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर; विरोधकांनी एकत्र येऊन विचार करावा, माजी मंत्री शरद पवार यांचे मत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असून, अधिवेशनात विरोधकांना बोलून द्यायचे नाही आणि सभागृहात गोंधळ करून हवी ती विधेयके मंजूर करून घेण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. असे चित्र यापूर्वी कधीही नव्हते. हा प्रकार किती दिवस चालणार, हे माहीत नाही. मात्र, आता याचा विचार विरोधकांनी एकत्र बसून करावा, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आणि खासदार संजय राऊत यांच्या अटकेसाठी सत्तेता गैरवापर झाला, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा >>>पुणे: सनदी लेखापाल अभ्यासक्रमात पुढील वर्षी बदल; भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक्रमात समावेश

बारामतीत प्रसार माध्यमाशी बोलताना पवार यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, की देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आजपर्यत कधी असे चिञ पाहिले नाही. याचा विचार करावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षाने संसदेचा दर्जा राखण्यासाठी महत्वाची पाऊले टाकली पाहिजेत.

हेही वाचा >>>पुणे : येरवड्यात दोन गटात हाणामारी; अकरा सराईत गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा

अनिल देशमुख ,नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या अटकेसाठी सत्तेता गैरवापर झाला. देशमुख आणि राऊत यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आलेले नाही. मात्र, घाबरवून सोङण्याचे काम झाले, असेही पवार म्हणाले.देशात ५६ ते ६० टक्के लोक शेती व शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. पाऊस झाला की शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढते. भारत हा निर्यातदार देश असू शकतो. अर्थव्यवस्थेसाठी सर्वांनी एकञ आले पाहिजे. सत्तेवर कुणीही असले तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारावी लागेल. त्या मध्ये राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून काम केले गेले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 17:29 IST

संबंधित बातम्या