पुणे: मनसेचे माजी माथाडी अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या | Former MNS Mathadi president Nilesh Mazire wife committed suicide pune print news rbk 25 amy 95 | Loksatta

पुणे: मनसेचे माजी माथाडी अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या

मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

suicide
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश माझिरे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीने विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांच्य मृत्यू झाला.

आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, मझिरे यांनी ४०० कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:02 IST
Next Story
पुणे: राज्यसेवेतील बदल २०२३पासूनच करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींचे पुण्यात आंदोलन सुरू