पुणे : पुण्यात ॲप आधारित रिक्षासेवेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) चार कंपन्यांनी परवानगी मागितली होती. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या चारही कंपन्यांना परवाना नाकारला असून, पुण्यात उपयोजन (ॲप) आधारित रिक्षा सेवा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यात ॲप आधारित रिक्षासेवा सुरू करण्यासाठी ॲनी टेक्नॉलॉजी, उबर इंडिया सिस्टीम्स, किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज आणि रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस या चार कंपन्यांनी परवानगी नाकारण्यात आली आहे. ‘मोटार वाहन समुच्चयक मार्गदर्शक सूचना- २०२०’ मधील आवश्यक तरतुदींची पूर्तता होत नसल्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – पिंपरी: मुख्यमंत्री व्हायला शंभर टक्के आवडेल; अजित पवार

टॅक्सीसेवाही अधांतरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲनी टेक्नॉलॉजी आणि उबर इंडिया सिस्टीम्स या दोन कंपन्यांनी ॲप आधारित टॅक्सीसेवेच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. या दोन्ही कंपन्यांचे अर्ज परिवहन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. परिवहन विभाग आता यावर अंतिम निर्णय घेणार आहे. पुण्यात ॲप आधारित टॅक्सीसेवा सुरू राहणार की नाही, हे परिवहन विभागाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.