लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या स्विफ्ट मधून चार कोटी पकडले आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कागदपत्रे, वाहन परवाना नाही. त्यामुळं या घटनेचा अधिक तपास आयकर विभाग करत आहे. महेश नाना माने (चालक), विकास संभाजी घाडगे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैसे घेऊन जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच एक पथक तयार करण्यात आलं. सोमवारी सायंकाळी सहा च्या सुमारास KA-53-MB-8508 मारुती स्विफ्ट ही गाडी भरधाव पुण्याच्या दिशेने येत होती. पोलिसांनी हाथ केल्यानंतर गाडी थांबली नाही. तिचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून थांबवले. चालक महेश आणि विकासला ताब्यात घेण्यात आलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four crore seized from car on pune mumbai highway kjp 91 hrc
First published on: 29-03-2022 at 20:14 IST