scorecardresearch

Premium

चार वर्षे रखडलेली पदभरती अखेर एमआयडीसीकडून रद्द

चार वर्षे प्रतीक्षा करून पदभरती रद्द आणि शुल्क परताव्याचीही स्पष्टता नाही, अशी उमेदवारांची कोंडी झाली आहे.

MIDC Recruitment cancelled
चार वर्षे रखडलेली पदभरती अखेर एमआयडीसीकडून रद्द (संग्रहित छायाचित्र)

पुणे : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे (एमआयडीसी) २०१९ मध्ये जाहीर करण्यात आलेली सरळसेवा भरती प्रक्रिया करोना प्रादुर्भावासह विविध कारणांनी रखडली होती. मात्र आता चार वर्षांनी ही पदभरती रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले असून या परीक्षेसाठी उमेदवारांकडून घेण्यात आलेले ५०० रुपये परीक्षा शुल्क परत देण्याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.

भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक एमआयडीसीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत गट क आणि गट ड मधील एकूण १४ संवर्गातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातील ५०२ पदे ही ऑनलाइन परीक्षेद्वारे तर ३६३ पदे ऑफलाइन परीक्षेद्वारे भरली जाणार होती. ५०२ पदांसाठी २० ऑगस्ट २०२१ ते २७ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाइन परीक्षा घेऊन १५ डिसेंबर २०२१ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यातील लघुलेखक संवर्गासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी ३० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
ajit pawar refuse rr patil group felicitation
राष्ट्रवादी पक्षप्रकरणी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लोकशाहीत बहुमताला…”
93-year-old Man is as healthy as a 40-year-old according to science These are his secrets To keep Heart Blood Body System Active
९३ वर्षांच्या खेळाडूचं शरीर अजूनही चाळिशीतच! ७३ वर्षे व्यायामही केला नाही, शेवटी अभ्यासात समोर आलं ‘हे’ गुपित
62 Year Old Man Vettromalla Abdul Raped 4th Standard Minor Granddaughter Convicted For 111 Years Will Only Serve 30 Years In Jail Why
६२ वर्षीय आजोबाला अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्या प्रकरणी १११ वर्षांची शिक्षा; पण तुरुंगावास फक्त ३० वर्षं, कारण..

हेही वाचा : महत्त्वाची बातमी : पुणे-मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या उद्या रद्द

मात्र, त्यानंतर आवश्यक असलेली व्यावसायिक परीक्षा होऊ शकली नाही. अखेरीस ही परीक्षा प्रक्रियाच रद्द करण्यात येत असल्याचे एमआयडीसीने परिपत्रकाद्वारे जाहीर केले. वाहनचालक, शिपाई, मदतनीस, अग्निशमन विमोचक, यंत्रचालक, चालक (अग्निशमन), वीजतंत्री ग्रेड २, मदतनीस अशा पदांची भरती रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : फेसबुकवरील मैत्रिणीला भेटायला हॉटेलवर गेला अन् जाळ्यात अडकला; पुण्यातील व्यावसायिकाबरोबर घडला विचित्र प्रकार

भरती प्रक्रिया रद्द करण्यामागे आकृतीबंध अंतिम नाही, महापरीक्षा संकेतस्थळाचा शासन निर्णय अधिक्रमित होणे, परीक्षा घेण्यासाठीच्या कंपन्यांचे पॅनेल स्थगित होणे अशी कारणे देण्यात आली आहेत. मात्र भरती प्रक्रिया रद्द करताना उमेदवारांनी परीक्षांसाठी भरलेल्या शुल्काच्या परताव्याबाबत परिपत्रकात स्पष्टता देण्यात आलेली नाही. उमेदवारांनी प्रत्येकी पाचशे रुपये परीक्षा शुल्क भरले होते. त्यामुळे चार वर्षे प्रतीक्षा करून पदभरती रद्द आणि शुल्क परताव्याचीही स्पष्टता नाही, अशी उमेदवारांची कोंडी झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four years pending midc recruitment process is finally cancelled pune print news ccp 14 css

First published on: 19-08-2023 at 11:18 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×