उजनी जलाशयात रविवारी बोट उलटून बुडालेल्या चारही डॉक्टरांचे मृतदेह बचावपथकांच्या हाती लागले आहेत. काही वेळापूर्वीच डॉ. अण्णासाहेब शिराडे यांचा मृतदेह सापडला. काल दुपारी दहा डॉक्टर उजनी जलाशयाच्या परिसरात फिरायला आले होते. यावेळी त्यांनी नावाडय़ाकडून होडी जलविहारासाठी घेतली. मात्र, जलाशयात गेल्यानंतर त्यांची होडी अचानकपणे उलटली. त्यामुळे होडीत असलेले दहा डॉक्टर पाण्यात पडले. त्यापैकी डॉ. प्रवीण श्रीरंग पाटील, डॉ. दत्तात्रय भगवान सर्चे, डॉ. दिलीप तुळशीराम वाघामोडे (तिघे रा. माळशिरस, जि. सोलापूर), डॉ. अतुल विनोदकुमार दोशी, डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडेकर, डॉ. समीर अशोक दोशी (तिघे रा. अकलूज, जि. सोलापूर) पोहून बाहेर आले. मात्र, डॉ. सुभाष मांजरेकर (रा. अकलुज, जि. सोलापूर), डॉ. महेश लवटे, डॉ. अण्णासाहेब शिराडे, डॉ. चंद्रकांत उराडे, (तिघे रा. नातेपुते, जि. सोलापूर) हे चौघेजण पाण्यात बुडाले. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंर स्थानिक नागरिकांच्याच मदतीने डॉ. मांजरेकर, डॉ. उराडे यांचे मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र, महेश लवटे आणि अण्णासाहेब शिराडे यांचा मृतदेह सापडत नव्हता. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, काल संध्याकाळपर्यंत त्यांचे मृतदेह सापडले नव्हते. अखेर अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली होती.

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Why Arvind Kejriwal allowed to keep toffees with him in Tihar jail
डायबिटीस असलेल्या अरविंद केजरीवालांना जेलमध्ये का देणार चॉकलेट-गोळ्या? मधुमेहींना कसा होतो गोडाचा फायदा?