पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढल्याने देशातील तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे इंधन दरात कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी याबाबाबतची मागणी पंतप्रधान आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे भाव कमी होऊन प्रतिबॅरल ७० ते ७३ डॉलरवर आले आहेत.

मागील काळात हे भाव वाढले असल्याने देशातील तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. आता हे भाव कमी होऊनही तेल कंपन्या इंधन दरात कपात करीत नाहीत. वाहतूक व्यवसायात सर्व प्रमुख घटक हा इंधन हा असतो. त्यातील वाढीमुळे वाहतूक दर वाढले असून, महागाईत भर पडली आहे. इंधनाच्या जास्त दरांमुळे वाहतूकदारांना व्यवसाय करणे कठीण जात आहे. इंधन दर आणि वाढती महागाई यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केल्यास त्यांना वाहतूकदारांना दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालेल्या खनिज तेलाच्या भावाचा फायदा तेल कंपन्यांनी मालवाहतूकदारांपर्यंत पोहोचवावेत, असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

pune airport latest marathi news
पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…
maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही