Premium

तळेगावमध्ये अँटी गुंडा पथक ऍक्टिव्ह; कीटक गॅंग ची काढली धिंड?

१२ मे रोजी झाली होती किशोर आवारे यांची हत्या म्हणून पोलिस पुण्याच्या तळेगावमध्ये कीटक गॅंग ची पिंपरी- चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने धिंड काढत तळेगावात कुठलीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच दिला आहे.

Anti-Gundam Squad Active in Talegaon

१२ मे रोजी झाली होती किशोर आवारे यांची हत्या म्हणून पोलिस पुण्याच्या तळेगावमध्ये कीटक गॅंग ची पिंपरी- चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने धिंड काढत तळेगावात कुठलीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच दिला आहे. १२ मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर तळेगावातील वातावरण आणखी तापले होते. तळेगावमधील गुंडगिरी कमी करण्यासाठी गुंडा विरोधी पथक तळेगाव येथे ठाण मांडून बसले आहे. तळेगावात सुरू असलेली भाईगिरी आणि गुन्हेगारी कमी करण्याचे आव्हान पिंपरी- चिंचवड पोलिसांसमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून कीटक गॅंग गंभीर गुन्ह्यात सहभागी होत असल्याचे आढळल्याने नुकतच दरोडा आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कीटक भालेराव, वैभव विटे, विशाल मुंजाळ, प्रदीप वाघमारे, ऋतिक मेटकरी, आर्यन गरुड जुवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पैकी, कीटक भालेराव याच्यावर दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर, वैभव विटे याच्यावर आठ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. इतर साथीदारांवर देखील गुन्हे दाखल आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gang active in talegaon pimpri chinchwad police arrested gang members kjp 91 ysh