सिंहगड रस्ता परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. चोरट्यांच्या टोळीने एका मोटारचालकास धमकावून लुटल्याचे तपासात उघडकीस आले.विनोद शिवाजी जामदारे (वय ३२, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक), रोहित विकास शिनगारे (वय १९, रा. जुनी म्हाडा काॅलनी, हडपसर), विशाल विठ्ठल रणदिवे (वय २२, रा. बार्शी, जि. सोलापूर), गौरव गंगाधर शिंदे (रा. ताड सौंदाने, ता. बार्शी, जि. सोलापूर), नितीन सुरेश जोगदंड (वय ३५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. सिंहगड रस्ता परिसरात मध्यरात्री चाेरट्यांनी टाेळी थांबली असल्याची माहिती गस्तीवरील पाेलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने नवले पूल परिसरात सापळा लावला.

हेही वाचा >>>पुणे: रुग्णांच्या आजाराची माहिती आता एका क्लिकवर !

चाेरटे जामदारे, शिनगारे, रणदिवे, शिंदे , जाेगदंड माेटारीत थांबले हाेते. पाेलिसांना पाहताच पसार हाेण्याच्या तयारीतील चाेरट्यांना पाेलिसांनी पकडले. जामदारे याच्या विराेधात सिंहगड रस्ता, दत्तवाडी, वारजे माळवाडी पाेलीस ठाण्यात खून, दराेडा, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत. शिंदे याच्या विरोधात बार्शी, जोगदंड याच्या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >>>पुणे: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारात चंदन चोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक राहुल यादव, दीपक कादबाने, कुरळे, केकाण, चव्हाण, उत्तेकर आदींनी ही कारवाई केली.