पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०१९ (पोलीस उपनिरीक्षक) परीक्षाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑिप्टग आउट) पर्याय निवडण्यासाठी एमपीएससीने १६ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एमपीएससी’ने  ही माहिती दिली. जाहीर करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांच्या अर्जातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणातील न्यायनिर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी पाठवलेला पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय निवडलेल्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश केला जाणार नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: General quality list sub inspector police released ysh
First published on: 09-03-2022 at 01:52 IST