छेडछाड तसेच पाठलागामुळे बारावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका १७ वर्षांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीवर बलात्कार; आरोपीस अटक

चंदननगर भागातील एका युवतीने राहत्या घरी १२ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. याबाबत युवतीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती केंद्रीय विद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती. ती महाविद्यालयातून घरी ये-जा करत होती. जुलै महिन्यापासून एक सतरा वर्षीय युवक तिचा पाठलाग करत होता. तिला वाटेत अडवून मैत्री करण्यासाठी धमकावत हाेता. पाठलाग; तसेच छेडछाडीमुळे युवतीने १२ ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

हेही वाचा- पुणे रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार; पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढविणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी सुरुवातीला विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. केंद्रीय विद्यालयातील शिक्षक, मैत्रिणी, नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. मुंढवा भागातील १७ वर्षीय युवक युवतीला त्रास देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन महिन्यानंतर युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करत आहेत.